BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जसं बायकोला सांभाळतो, तशीच रिक्षाही सांभाळली !

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वातानुकुलीत यंत्रणा, एलसीडी स्क्रीन, मोबाईल चार्जर, बल्ब, पाणी, घडय़ाळ, अत्यावश्यक सेवांचे फोन नंबर, प्रथमोपचार पेटी, स्टेअरींग, पुण्याची माहिती देणारा डिजीटल बोर्ड, साऊंड लाईट काय म्हणून नाही या रिक्षात. ज्या सुविधा व्होल्वो बसमध्ये मिळतात, त्या सर्व सुविधा प्रवाशांना या रिक्षातही अनुभवण्यास मिळतील. अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी नटलेली ही रिक्षा पुण्यातील रस्त्यावरून धावते.

पुण्यातील कोथरूड परिसरात वास्तव्यास असलेले कृष्णा मारणे 1978 पासून रिक्षा चालवतात. रिक्षा म्हणजे त्यांचा जिव की प्राण. साधारण पंधरा वर्षापुर्वी घेतलेल्या रिक्षाला त्यांनी सजवले. खरं तर रिक्षाला ना सौंदर्य असते ना आकार, पण लाखो रुपये खर्चून मारणे काकांनी या रिक्षाला रुपवान बनवले. ज्या सुविधा व्होल्वो बसमध्ये मिळतात, त्या सर्व सुविधा या रिक्षातही आहेत. सर्व सोयींनी सुसज्ज असलेली या रिक्षाने मुंबई, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी होणा-या रिक्षा स्पर्धेत भाग घेतला आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही पटकावलं.

आपल्या रिक्षाविषयी सांगताना मारणे काका म्हणतात, “संसारामध्ये बायको आणि रिक्षा या दोघांनीही सारखीच साथ दिली. त्यामुळे जसे बायकोला सांभाळतो तसेच रिक्षालाही सांभाळायच हे ठरवलं आणि तेव्हापासून आत्मियतेने रिक्षाची काळजी घेतली”

  

HB_POST_END_FTR-A4

.