Pune : मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळण्यासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटद्वारे जागरूकता व मोफत तपासणी मोहीम

एमपीसी न्यूज-मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळण्यासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटद्वारे जागरूकता व मोफत तपासणी मोहीमेचे आयोजन करण्यात आले (Pune) आहे.

मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व या समस्येची गंभीरता ओळखून, द अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी (AAO) आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (AIOS) यांनी जून २०२३ हा “मोतीबिंदू जागरूकता महिना” म्हणून घोषित केला आहे.त्यासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटद्वारे रविवार, 4 जून 2023 रोजी “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन” चे  आयोजन करण्यात आले आहे.

या वॉकथॉनची सुरुवात  सकाळी 7.30 वाजता  साधू वासवानी पुतळ्यापासून  होईल आणि गुलमोहर अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, पुणे येथे असलेल्या दादा लेझर आय इन्स्टिट्यूट येथे या वॉकथॉनची समाप्ती होईल.

Pune : पीएमपीएमएलच्या 7 व्या पर्यटन बससेवेचा शुभारंभ

“कॅटरॅक्ट वॉकथॉन” आणि मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्वरीत नोंदणीसाठी (30  जून 2023 पूर्वी) इच्छुक 9922995549 या डीएलईआयच्या  अधिकृत क्रमांक वर कॉल करू शकतात. या मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीसाठी लवकर नोंदणी करणाऱ्यांना किंवा शस्त्रक्रियेसाठी देखील 20 % सवलत मिळेल.
 
 उशीरा नोंदणी (1 जुलै 2023 नंतर) मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी किंवा शस्त्रक्रियेसाठी निर्धारीत तारखेनंतर नोंदणी करणाऱ्या व्यक्ती देखील 10 % सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

या मोतीबिंदू अंधत्व निवारणाच्या जनजागृतीसाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डीएलईआय कडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.