Pune : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर : ॲड. प्रकाश आंबेडकर

अयोध्येचा निकाल हा भावनेवर देण्यात आला : ayodhya is a cultural city of Buddhists: Adv. Prakash Ambedkar

एमपीसी न्यूज – अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर असल्याचे उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून सिद्ध झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून दिली आहे. अयोध्येचा निकाल हा भावनेवर देण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात भारतीयांकडे संशयाच्या नजरेतून बघितले जात असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.

अयोध्या ही बौद्धांची सांस्कृतिक आणि ज्ञानाचे केंद्र होते. ती बुद्धकालीन साकेत नगरी होती, असे महान विचारवंत राहुल सांकृत्यायन यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. मात्र, अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला असून हा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला.

सर्वोच्च न्यायालयानेही इतिहासाला आणि पुराव्यांना ग्राहय धरले नाही. मंदिर व मशिदीच्या वादातून एक मार्ग काढला जात आहे.

वैदिक धर्म मानणारे लोक दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असून ते लोक सध्या अयोध्येत आहेत. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाहीत, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.

अलाहाबाद न्यायालयाने सत्य शोधण्यासाठी अयोध्येत उत्खनन करायला सांगितले. अयोध्येतील अर्ध्या भागात बौद्धकालीन पुरावे व अवशेष सापडले. त्यामुळे अयोध्या बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते.

मात्र, सध्याची परिस्थिती पाहून राम मंदिर उभारण्याची गरज आहे. त्यामुळे राम मंदिराच्या बाजूने निकाल देत आहोत, असे अलहाबाद न्यायालयाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.