Pune : ‘त्या’ दिवशीही अयोध्या अशीच सजली होती’; अभिनेता प्रवीण तरडेंनी जागवल्या तेव्हाच्या आठवणी

कोथरूडमध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते श्रीरामाची आरती ; Ayodhya was decorated like that even on that day; Memories of when actor Praveen Tarde woke up

एमपीसीन्यूज : अयोध्येत 1992 साली झालेल्या आंदोलनात मी सहभागी होतो. तेव्हा संपूर्ण वातावरण आजच्यासारखचं भारलेलं होत.या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापटीत माझा हात तुटला होता. तेव्हा माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी मला रुग्णालयात नेले होते. आज अयोध्या जेेेवढी सजली आहे तेव्हाही ती तितकीच सजली होती, असे सांगत अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 1992 सालच्या आठवणी जागवल्या.

राममंदिराचं भूमिपूजन होत असतानाच पुण्यात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा होत होता. कोथरूडमध्ये शिवाजी महाराज पुतळा चौकात श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात आली.

याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली. पुणेकरांना लाडूचा प्रसाद वाटण्यात आला.

रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झालेले अभिनेते प्रवीण तरडे यावेळी उपस्थित होते.

प्रवीण तरडे म्हणाले, अयोध्येत आज राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. हा विजय त्या प्रत्येक माणसाचा आहे ज्यांनी मनापासून राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय धर्म जोपासण्याचा प्रयत्न केला.

रामजन्मभूमीसाठी जे आंदोलन झालं होतं, त्याच फलित आजपासून सुरू झालं. जगाला आश्चर्य वाटेल असे राममंदिर अयोध्येत उभे राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.