Pune : ‘आझम कॅम्पसची जागा ‘क्वारंटाईन’साठी देणार; डॉ. पीए इनामदार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या संख्येत सुद्धा वाढ होत असल्यामुळे आझम कॅम्पसची जागा संशयित कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी व्यवस्थापनाने देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत आझम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पीए इनामदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तयारी दर्शवली आहे.

पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प,भवानी पेठ,नाना पेठ ला लागून असणाऱ्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आज (बुधवारी) आझम कॅम्पसच्या वतीने पत्र देण्यात आले.

व्यवस्थापनाने आझम कॅम्पसमधील प्रार्थना स्थळाची सर्व सुविधांसह दुमजली जागाही देण्याची तयारी दर्शवली आहे. येथे आलेल्या रुग्णांची नाश्ता, जेवण, पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

आझम कॅम्पसमधील शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध असेल, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.