Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; वानवडी पोलिसात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे कोंढाव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांना तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केली.

हा प्रकार मंगळवारी रात्री रेसकोर्स जवळील टॅर्फ क्लबच्या समोर घडला. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, अब्दुल गफूर पठाण हे मंगळवारी रात्री नातेवाईकांच्या एका कार्यक्रमासाठी रेसकोर्स जवळील टॅर्फ क्लबजावळ गेले होते. त्यावेळी त्यांना एक फोन आला आणि अरेरवीची भाषा करत त्यांना बाहेर बोलावले. अब्दुल गफूर पठाण हे बाहेर येताच तीन ते चार जणांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवला आणि बेदम मारहाण केली. वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.