Pune : बाएफ संस्थेद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा

एमपीसी न्यूज – पर्सिस्टंट फाउंडेशन पुरस्कृत बाएफ ( Pune ) संस्थेच्या माध्यमातून दि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन भावडी, ता. आंबेगाव, जिल्हा. पुणे येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

बाएफ संस्थेचे सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत चिंच, जांभूळ या प्रकारच्या अनेक वृक्षांचे बी रोपण करण्यात आले. संस्थेमार्फत पर्यावरण दिनानिमित्त गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

PCMC : महापालिका सेवकांच्या पतसंस्थेच्या सभासदांना 14 टक्के लाभांश जाहीर

यावेळी संस्थेचे प्रवीण रणखंबे , अजित लोखंडे, मयूर बडाख, यांचे सहकार्य, राहुल व अजित साहेब यांनी मार्गदर्शन केले. उपसरपंच सोपान हरिभाऊ काळे, पंडित कातळे सुनील कातळे, ज्ञानेश्वर एरंडे,

बाबाजी कुदळे, गिरीश चक्कर ज्ञानेश्वर चक्कर ग्रामपंचायत सदस्या उज्वला काळे, चित्रा मोरे, सीमा चक्कर, शारदा रघुनाथ चक्कर मीनाक्षी वाळके, वैशाली चक्कर, सुखदेव मोरे, लहुनाथ चक्कर, सोपान नवले हे ग्रामस्थ उपस्थित होते. भावडी गावाचे सामाजिक कार्यकर्ते व समन्वयक संतोष शांताराम वाळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार ( Pune ) पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.