Pune : बॅग मौल्यवान साहित्यासह केली पोलिसांच्या हवाली, इमानदार रिक्षा चालकाचे पोलिसांनी केले कौतुक

एमपीसी न्यूज – जे माझे नाही ते देखील माझेच आहे म्हणणाऱ्या जगात (Pune) आजही काही बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती आहेत, ज्या कोणताही लोभ मनाशी न बाळगता आपले काम इमानेइतबारे करत असतात. असाच एक अनुभव मुंढवा पोलिसांनी घेतला आहे. पुलावर बेवारस सापडलेली महिलेची बॅग एका रिक्षा चालकाने मौल्य़वान साहित्यासह पोलिसांच्या हवाली केली आहे. या बॅगमध्ये 1 लाख 10 हजार रुपयांचे साहित्य होते.

रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, पुणे मुळ पत्ताः नेवासा, जि. अहमदनगर) यांना खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात असतांना मुंढवा ओव्हरब्रिजवर एक लेडीज बॅग मिळून आली, त्यांनी कोणताही लोभ न करता ही बॅग मुंढवा पोलीस ठाणे येथे जमा केली.

या बॅगची पाहणी करता बॅगमध्ये ॲपल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, मोबाईल चार्जर असे अंदाजे 1 लाख 10 हजार रुपये एवढ्या किंमतीचा मुद्देमाल तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कॉर्ड, गाडीचे आरसी बुक इ. महत्त्वाचे कागदपत्र मिळून आली.

Maval : घेरेवाडी शाळेत रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी पालकांची गर्दी

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना मिळताच त्यांनी सदर आरसी बुक वरील आरटीओ नंबरवरुन वाहन मालकाचे नाव मोबाईल नंबर प्राप्त करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहायाक पोलीस फौजदार, रमेश उगले यांनी माहिती प्राप्त केली असता, ममतोष प्रकाश, रा. पटना यांना संपर्क केला त्यांनी माझी मुलगी माही मुस्कान ही ॲमेनॉरा सिटी, पुणे येथे राहण्यास असून हे वाहन मुलगी वापरत असल्याचे सांगितले.

माही मुस्कान यांना मुंढवा पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले, ही लेडीज बॅगची व त्यामधील किंमती मुद्देमाल व ओळखपत्रावरुन खात्री झाल्याने बॅग माही मुस्कान यांना परत करण्यात आली. बॅग लॅपटॉप व सर्व वस्तुसह परत मिळाल्याने माही मुस्कान यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत. तसेच ममतोष प्रकाश रा. पटना यांनी पुणे शहर पोलीस दलाचे कौतुक केले.

रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे यांनी त्यांची हालाखीची व गरीबीची परिस्थिती असताना देखील कोणताही लोभ न बाळगता सदरची बॅग पोलीस ठाणे येथे जमा करुन माणुसकीचे उत्तम उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांचे उत्कृष्ट कामाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दखल घेवून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला (Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.