Pune : दीपक मानकर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी कारागृहात असलेल्या नगरसेवक दीपक मानकर यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दीपक मानकर यांनी पुण्यात भव्य शिवसृष्टी व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता. कोथरूडमधील बिडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसृष्टी करणार असल्याचे त्यांच्या वचननाम्यात म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.