Pune : डीएसके यांच्या सुनेला अटकपूर्व जामीन

एमपीसी न्यूज- ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची सून तन्वी शिरीष कुलकर्णी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तन्वी कुलकर्णी यांच्यावतीने ऍड. श्रीकांत शिवदे व ऍड चिन्मय इनामदार यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

_MPC_DIR_MPU_II

‘तन्वी या डीएसके आणि ब्रदर्स कंपनीच्या नामधारी भागीदार होत्या. डीएसके समूहातील कोणत्याही दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. पूर्वी त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून केवळ डी एस कुलकर्णी यांची सून असल्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे’ असा युक्तिवाद ऍड. श्रीकांत शिवदे यांनी केला.

दरम्यान, डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी, पुतणी सई वांजपे व अश्विनी देशपांडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच निकाल देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.