Pune: सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे सोमवारी उद्धाटन : महापौर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उदघाटन सोमवारी (दि. 9 मार्च) दुपारी 4 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना जगातील वैमानन क्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञान याचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने ‘एव्हिएशन गॅलरी’ हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. विमानांविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच एक कुतुहल असते. विमान तसेच वैमानन उद्योगात असलेल्या रोजगाराच्या विविध संधी याविषयी सर्वांगीण व शास्त्रशुद्ध माहिती देणारे कायमस्वरूपी प्रदर्शन ‘एव्हिएशन गॅलरी’ या प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या बंद असलेल्या शाळा क्रमांक 14 च्या आवारातील दर्शनी भागातील बंद असलेल्या शाळेच्या 4 मजली इमारतीमध्ये ही ‘एव्हिएशन गॅलरी’ असल्याचे ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले. तसेच, ही गॅलरी उभारण्यासाठी माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांची मदत झाली, असेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.