Pune : ‘महामेट्रो’ला देखील हिंसक महाराष्ट्र बंदचा फटका !

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यातील काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो कंपनीचे 15 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संतप्त जमावाने मेट्रोच्या जेसीबी यंत्राच्या काचा तोडल्या. वाहतूक विषयक सूचना देणाऱ्या एलईडी स्क्रीनचे नुकसान केले. बॅरिकेटस तोडले. हे लक्षात घेता मेट्रोचे एकूण 15 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, आंदोलकांनी पुणे शहरातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, ते मान्य करून काम बंद ठेवले असतानाही तोडफोड झाल्याबद्द्ल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.