Pune Bandh News: उद्या 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार, व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा 

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापारी पुणे, महासंघाने पाठिंबा देत उद्या (सोमवारी) 3 वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी (दि.11) दुपारी 3 वाजेपर्यंत लक्ष्मी रस्त्यासह सर्वच व्यापारी पेठांमधील दुकाने बंद राहणार आहे. मात्र, दुपारी तीननंतर दुकाने उघडण्यात येणार असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.

व्यापारी कोणत्याही पक्षाचा नसतो. सध्या नवरात्र सुरू आहे. लॉकडाऊनमधून आताच व्यापारी बाहेर आले आहेत. त्यामुळे व्यावसाय करण्याची परवानगी देण्याची व्यापाऱ्यांची इच्छा होती. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. दुपारी 3 पर्यंत दुकाने बंद ठेवून पाठींबा देण्याची मागणी केली.

त्यानुसर पुणे व्यापारी महासंघाची झुमवर मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडींच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला सुमारे 95 टक्के व्यापाऱ्यांनी संमती दर्शवली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रांका आणि पितळीया यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.