BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पुणे, बारामतीसाठी 23 तर,  शिरुर, मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला निवडणूक 

1,447
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या क्षणापासून लागू झाली आहे. यंदा देशात 7 टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी चार टप्यात मतदान होणार असून पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामतीत 23 तर  शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवारी) निवडणुकीची घोषणा केली. या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
  • महाराष्ट्रात चार टप्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 मतदार संघासाठी 11 एप्रिलला मतदान होणार आहे. तर, 18 एप्रिलला दहा मतदारसंघासाठी, 23 एप्रिलला चौदा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिलला 17 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चार मतदार संघासाठी दुस-या टप्यात मतदान होणार आहे.
पुण्यातील चार मतदार संघासाठी दुस-या टप्यात मतदान होणार आहे. पुणे, बारामतीत 23 तर शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तर, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3