Pune : बर्नार्ड बॉयटेक्स यांची ‘पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्टस्, डिझाईन्स,ग्राफिक्स,आर्टस’ ला भेट

एमपीसी न्यूज- टून बूम अॅनिमेशन कंपनीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे संचालक बर्नार्ड बॉयटेक्स यांनी पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्टस्, डिझाईन्स, ग्राफिक्स, आर्टस’ला भेट दिली. त्यांच्या समवेत कंपनीचे भारत प्रतिनिधी प्रेम मोझेस हे होते.

हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला. पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्टस् , डिझाईन्स,ग्राफिक्स, आर्टस ‘चे अधिष्ठाता ऋषी आचार्य यांनी स्वागत केले. टू -डी अॅनिमेशन क्षेत्रातील नवे ज्ञान पुण्यात आणण्यासाठी, पुण्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी मिळण्यासाठी बर्नार्ड बॉयटेक्स यांनी मार्गदर्शन करावे, असे अधिष्ठाता डॉ .ऋषी आचार्य यांनी यावेळी सांगीतले.

‘एनिमेशन क्षेत्रात सतत नवीन बदल होत असून ते आत्मसात केले पाहिजेत’, असे प्रतिपादन बर्नार्ड बॉयटेक्स यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.