Pune : कुत्रे फिरायला घेऊन जाताय ? तर मग त्याची घाण देखील उचला, अन्यथा……

एमपीसी न्यूज- पाळीव कुत्री घेऊन सकाळी-संध्याकाळी फिरायला घेऊन जात असाल तर सावधान ! आपल्या कुत्र्याने रस्त्यामध्ये घाण केली तर ती त्याच्या मालकाला उचलावी लागणार आहे. अन्यथा पुणे महापालिकेच्या घन कचरा विभागाचे अधिकारी दंड ठोठावतील.

_MPC_DIR_MPU_II

अलीकडेच घडलेल्या प्रकारामध्ये या अधिकाऱ्यांनी संबंधित मालकांकडून दंडाची वसुली तर केलीच त्याशिवाय त्यांच्याकडून रस्ता देखील धुवून घेतला.  फिरायला आणलेली कुत्री रस्त्यावर,पादचारी मार्गावर, मैदान तसेच बागेत घाण करतात. या घाणीमुळे सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात अनेक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर कोथरूड क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.