Pune : ‘एप्रिल फूल’ कराल तर खबरदार; अफवा पसरवली जाऊ नये म्हणून घेतली जातेय दक्षता

एमपीसी न्यूज – सध्या ‘कोरोना’च्या पार्शवभूमीवर ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या ‘एप्रिल फूल’ दरम्यान कोणत्याही प्रकारे अफवा पसविणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवून नागरिकांची कोणत्याही प्रकारे दिशाभूल होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे. ती म्हणजे ‘एप्रिल फूल’ कराल तर खबरदार, अशा इशारा दिला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, 1 एप्रिल2020 रोजी बरेच लोक आपले मित्र परिवार हित संबंधितांना, नातेवाईकांना ‘एप्रिल फूल’ करत असतात. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो असतो. परंतु सद्यस्थितीत आपल्यावर असणारे कोरोना व्हायरसचे संकट तसेच संचारबंदी यामुळे आपण कोरोना व्हायरसच्या संदर्भाने कोणत्याही प्रकारचे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतील, अशा प्रकारचे मेसेज टाकू नये.

सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत. जेणेकरून लोकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही. प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. आपण सर्व सूज्ञ नागरिक आहात. आपण असे करणार नाही, अशी आपल्याकडून अपेक्षा आहे.

जर अशा स्वरूपाचे मेसेज आपल्याकडून सोशल मीडियावर व्हारल झाल्यास व्हायरल करणाऱ्यावर त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल होतील. ग्रुप ॲडमिनने आत्ताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल, असे सेटिंग करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.