Pune : पुणेकरांनो सावधान; ‘कोरोना’मुळे पुण्यात 24 तासांत 8 जणांचा मृत्यू!, तर एकूण मृतांची संख्या 16
एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. बुधवारी तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 16 झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनो सावधानता बाळगा, आणि प्रशासनास सहकार्य करा, असेही आवाहन वेळोवेळी केले जात आहे.
आतापर्यंत ससूनमध्ये 11, डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 1, नोबेल 1, इनामदार हॉस्पिटलमध्ये 1, औंध सिव्हिल रुग्णालयात 1, डीएमएच रुग्णालयात 1, आशा 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.
- पुण्यात सकाळपासून 25 नवे कोरोनाबाधित -महापौर
पुणे शहरात आज नव्याने 25 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. संबंधित रुग्ण शहराच्या विविध भागातील आहेत. पुणे शहरात एकूण 154 कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यातील हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित एकूण मृतांची संख्या : 16
ससून हॉस्पिटल – 11
औंध हॉस्पिटल – 1
दिनानाथ हॉस्पिटल – 1
डॉ. नायडू हॉस्पिटल – 1
नोबेल हॉस्पिटल – 1
इनामदार हॉस्पिटल – 1
एकूण मृतांची संख्या : 16