Pune : ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान’चा रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

एमपीसी न्यूज – पुणे येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ यंदा ‘सिर्फ ट्रस्ट’च्या योगेश चिथडे आणि सुमेधा योगेश चिथडे या दाम्पत्यास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 15 डिसेम्बर 2019) सायंकाळी 4 वाजता निवारा सभागृह, नवी पेठ, एस. एम. जोशी पुलाजवळ, पुणे येथे होणार आहे,अशी माहिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान उद्योजक अरुण फिरोदिया भूषविणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुणे येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान हे चाळीस वर्षे अविरतपणे समाजसेवा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिष्ठानच्या वतीने ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ वितरित करण्यात येतो.

यंदाचा पुरस्कार सियाचीनमध्ये जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या ‘सिर्फ ट्रस्ट’च्या योगेश चिथडे आणि सुमेधा योगेश चिथडे या दाम्पत्यास जाहीर करण्यात आला आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते नंदादीप पाळणाघर आणि बालक मंदिराच्या नंदाताई बराटे यांनाही गौरव पत्र देण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 15 डिसेम्बर 2019) सायंकाळी 4 वाजता निवारा सभागृह, नवी पेठ, एस. एम. जोशी पुलाजवळ, पुणे येथे होणार आहे.

तसेच भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे, असे भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वसुंधरा केळकर, सचिव वंदना केळकर आणि संयोजक प्रणोती गर्गे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.