Pune : भरत नाट्य संशोधन मंदिराने सर्वांना आपली दारे खुली केली – गिरीश कुलकर्णी

एमपीसी न्यूज – भरत नाट्य संशोधन मंदिराने सर्वांना आपली दारे खुली, असे अभिनेता व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

रोटरी डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटी व भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने, रस-भाव-रंजन नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उदघाटन रविवारी गिरीष कुलकर्णी, एअर चीफ मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्याध्यक्ष अभय जबडे, आनंद पानसे, रवी धोत्रे  यावेळी उपस्थित होते़. दि. २२ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भरत नाट्य मंदिराने माणसांबद्दल कलेबाबतची जाणीव पिढ्यान् पिढ्या करून दिली आहे़. कला क्षेत्रात माणसे घडविण्याची काम या संस्थेने केल्याचेही कुलकर्णी म्हणाले. रोटरी आणि नाट्य मंदिराने सुरू केलेला हा महोत्सव स्तुत्य असून, नाटकात काम केल्याचे भूषण गोखले म्हणाले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते नाट्य क्षेत्रात कार्यरत संस्थाचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.