Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इनोव्हेशन डे’ साजरा

एमपीसी न्यूज- ‘भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ‘इनोव्हेशन डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘इनोव्हेशन डे’ चे उदघाटन
प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी केले. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या पुढाकाराने ‘इनोव्हेशन डे’ साजरा केला जातो.

यानिमित्त अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची विज्ञान, तंत्रज्ञान विषयक नाविन्यपूर्ण संकल्पनांची ‘आयडिया कॉम्पिटिशन’ आयोजित करण्यात आली होती. 600 विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला .विज्ञान ,तंत्रज्ञान विषयक नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण त्यांनी केले. संयोजक डॉ. बिंदू गर्ग यांनी स्वागत केले. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेतील संकल्पनांचे परीक्षण केले.यातील निवडक संकल्पनांचे प्रकल्प तयार केले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.