_MPC_DIR_MPU_III

Pune : भारतीय विद्या भवनमध्ये शुक्रवारी ‘रागभावरंग’

एमपीसी न्यूज- ‘भारतीयविद्या भवन’आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘रागभावरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 8) संध्याकाळी 6 वाजता ‘भारतीय विद्या भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनीही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

रागभावरंग ही शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी व हिंदी नाटयगीते, भावगीते, भक्ती गीते, लावणी, निसर्ग गीत, चित्रपट गीतांची मैफिल आहे.
या कार्यक्रमात डॉ. सौ. अनघा राजवाडे, नीरज केतकर व चंद्रकांत निगडे (गायन),उदय शहापूरकर (हार्मोनियम), अशोक मोरे (तबला), रमेश मंगळूरकर (तालवाद्य), प्राजक्ता मांडके (निवेदन) हे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.