Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट

एमपीसी न्यूज – भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल मैनी याला ‘एमिरेट’ या दुबईच्या कंपनीत आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे दिली . या प्लेसमेंट नुसार त्याला वार्षिक 34 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे .राहुल मैनी हा आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळविणारा या महाविद्यालयाच्या ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ‘ सेलचा पहिला विद्यार्थी ठरला आहे .

या प्लेसमेंट साठी निवड होण्यासाठी त्याला प्रवेश परीक्षा आणि त्री -स्तरीय मुलाखतींच्या फेऱ्यांमधून पुढे जावे लागले . अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कौशल्ये वृद्धिंगत करण्याबरोबरच त्यांना रोजगार संधींसाठी सक्षम करण्यासाठी महाविद्यालय विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे परिश्रम घेत असून त्याचा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास फायदा होत असल्याचे डॉ. आनंद भालेराव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.