Pune Crime : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज –  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेजवळ 13 डिसेंबर रोजी 27 वर्षीय तरुणाचा दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून (Pune Crime) खून करण्यात आला होता. याच गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दत्ता राहूल कदम (वय 22 रा.आंबेगाव) व अजय सदाशिव रेणूसे (वय 24 रा.आंबेगाव) अशी अटक आरोपींची नावे असून या दोघांनी 13 डिसेंबर रोजी प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय 27) याला दगडाने व रॉडने मारहाण केली होती. यामध्ये प्रकाश गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते मात्र 19 डिसेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Bhosari : अपना वैश्य समाजाच्या वतीने मासिक सत्यनारायण कथेचे आयोजन

पोलिसांनी मयताची ओळख पटवली होती मात्र आरोपी अद्याप फारार होते. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन मोरे यांना आरोपी हे 30 जानेवारी रोजी कात्रज बोगद्या जवळ थांबले असून ते त्यांच्या नातेवाईकांना भेटून पुन्हा फरार होणार आहेत, (Pune Crime) अशी खबर मिळाली. पोलिसांनी कात्रज बोगद्या जवळ जाऊन सपाळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.