Vehicle Theft: वाहनचोरी करणाऱ्या सराईताला बेड्या ठोकत चार गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज : पुणे परिसरात सराईतपणे दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावरील चार गुन्ह्यांची उकल यावेळी करण्यात आली आहे.(Vehicle Theft) ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.9) गुजर निंबाळकरवाडी येथे केली.

रोहित राजू माने (वय.20 रा. गुजर निंबाळकरवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरांचा तपास करत असताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमोले व अवधुत जमदाडे यांना बातमी मिळाली की, एक तरुण रोज परिसरात पार्क केलेल्या दुचाकी न्याहळत असतो. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुचाकीवरून परिसरात चकरा मारणाऱ्या मानेला हटकले. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला अटक केली.

Pimple Nilkh News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप

त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, खडक पोलीस ठाणे,कोंढवा पोलीस ठाणे यांच्या परिक्षेत्रातून तीन दुचाकी व एक रिक्षा चोरल्याचे कबुल केले. (Vehicle Theft) याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.