Pune : भवानी पेठेत कोरोनाचे तब्बल 85 तर, कसब्यात 42 रुग्ण!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असून पुणे स्मार्ट सिटीने या संदर्भात नकाशा प्रसारित केला आहे. त्यामध्ये भावणीपेठेत तब्बल 85 रुग्ण आहे. तर, कसबा – विश्रामबागवाडा भागात 42 रुग्ण आहेत. दाटीवाटीने असलेल्या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत.

औंध – बाणेर 3, कोथरूड – बावधन 1, वारजे – कर्वेनगर 9, सिहगड रोड 5, धनकवडी – सहकारनगर 22, कोंढवा – येवलेवाडी 8, बिबवेवाडी 12, शिवाजीनगर – घुलेरोड 17, ढोले पाटील रोड 40, नगर रोड – वडगावशेरी 4, येरवडा – कळस – धानोरी 28, वानवडी – रामटेकडी 18, हडपसर – मुंढवा 21 असे 331 कोरोनाचे 331 रुग्ण आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयात 249 तर, ससून रुग्णालयात 82 रुग्ण आहेत. काल दिवसभरात 4 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी अर्धे पुणे सील करण्यात आले आहे. तर, काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 38 वर गेली आहे.

पुण्यातील मृत्युदर हा सर्वाधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यांनतर आता हे संकट आणखी गडद होत असून उपनगरांतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.