Pune : भिडे पूल पाण्याखाली !

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून खडकवासला 27 हजार 203 क्युसेक पाणी मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे नाराणपेठेतील भिडेपूल पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या रस्त्यावर उभी केलेली एक कार आणि गणेश मूर्तीचे स्टॉल पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.