Pune : भिडे पूल पाण्याखाली !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रासह पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये देखील तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज खडकवासला धरणातून 13981 कयूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी मुठा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नारायण पेठेतील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सदर भागात मनपाच्या वतीने सूचना फलक लावले असून मनपा कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी नदीपात्रातील रस्ते वाहतूकीस वापरू नयेत, या रस्त्यावर वाहने उभी करू नयेत, उभी केलेली वाहने सुरक्षित जागी लावावीत अशी सूचना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.