Pune : मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाच जिल्ह्यातून तडीपार करा, भीम आर्मी संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दरवर्षी प्रमाणे यंदा देखील 1 जानेवारी 2019 ला राज्यातील अनेक भागातील लाखोंच्या संख्येने नागरिक अभिवादन करण्यास येणार आहे. गतवर्षी ची घटना लक्षात घेता 25 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 पर्यन्त मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाच जिल्ह्यातून तडीपार करावे आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे. अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी दत्ता पोळ म्हणाले की, गेल्यावर्षी भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी दरम्यान घडलेल्या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे, मनोहर एकबोटे यांच्यावर सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.

तसेच ते पुढे म्हणाले की, पुण्यात 30 डिसेंबर 2018 ला दुपारी तीन वाजता भीमा कोरेगाव संघर्ष महा सभेला भीम आर्मी संघटनेचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा होणार असून मात्र या सभेला परवनगी देण्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. मात्र मागील वर्षभरात भिडे ना तात्काळ पोलीस आणि प्रशासन राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम किंवा सभा घेण्यास परवानगी देत आहे. असा दुजाभाव होता कामा नये. आम्ही कोणत्याही परिस्थिती चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण  यांची सभा घेणार असून त्या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास न्यायालयात दाद देखील मागितली जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.