Pune : लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल 

Pune: Bhimsen Agrawal appointed as the President of Lions Club of Pune Agra Sapphire उपाध्यक्षपदी राजेश अग्रवाल तर सचिवपदी रोहित गुप्ता

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायर या नवीन लायन्स क्लबची स्थापना करण्यात आली असून सन 2020-21 या वर्षीची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी राजेश अग्रवाल व सचिव रोहित गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे.

क्लबच्या कोषाध्यक्षपदी अशोक बन्सल, जनसंपर्क अधिकारी रवी सातपुते, सल्लागार समिती अध्यक्षपदी अशोक अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी बोलताना भीमसेन अग्रवाल म्हणाले की, कोरोना पासुन बचाव करण्यासाठी आम्ही हजारो लोकांना होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 आणि मास्कचे वितरण केले. लायन्स क्लबच्या माध्यमातून वर्षभर वृक्षारोपण, अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, पाणी अडवा, पाणी जिरवा,बेटी-बचाओ-बेटी पढाओ, प्रौढ शिक्षण, ग्रामीण विकास सारखे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

लायन्स क्लबचे इंटरनॅशनल संचालक नरेंद्र भंडारी, मल्टीपल काऊंसिल चेअरमन गिरीश मालपाणी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राज मुछाल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.