-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : भीमथडी जत्रेतील 82 महिला बचतगटांना रंगूनवाला इन्स्टिट्यूट’ तर्फे फॉस्टेकचे प्रशिक्षण

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- ‘भीमथडी ‘जत्रेत सहभागी होणाऱ्या 82 महिला बचत गटांना खाद्य पदार्थांची स्वच्छता, व्यावसायिक नियम, खाद्य परवाने, व्यक्तिमत्व विकास याबाबत शारदानगर आणि पुणे येथे ‘ एम.ए. रंगूनवाला इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च ‘,पुणे यांच्या वतीने फॉस्टेकचे (FSSAI) प्रशिक्षण देण्यात आले.

महिला बचत गटांना अन्न परवाना याबाबत शासकीय कायदे, अन्न पदार्थांची स्वच्छता, ग्राहक सेवा, व्यक्तिमत्व विकास, ग्राहक वर्तन याबाबत या प्रशिक्षण कार्यक्रमात सुनंदा पवार, तज्ज्ञ मार्गदर्शक अनिता फ्रन्झ, आकाश वाळके, पुनीत बसून यांनी माहिती आणि प्रशिक्षण दिले.

कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यातील बारकावे, नियम, अटी समजून व्यावसायिक स्पर्धेत उतरले पाहिजे कारण दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा खडतर आहे. यासाठी नाविन्यपूर्ण व्यावसायिक माहिती प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे असे मत अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

भीमथडीची पूर्वतयारी म्हणून गेली 12 वर्ष भीमथडी जत्रेत सहभागी बचत गटांना प्रशिक्षण दिले जाते. सहभागी महिला बचत गटांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून पुढील व्यवसायास त्यांना प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याचे आकाश वाळके यांनी सांगितले.

प्रशिक्षण आयोजन आणि हेतु याबाबत सचिन खलाटे प्रकल्प अधिकारी यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला विजय कोकाटे, शुभांगी तावरे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.