Pune : पश्चिम किनारपट्टीवरील दुर्गदर्शन आणि संवर्धनाचा प्रसार मोहिमेवर निघाले भूपेंद्र डेरवणकर

एमपीसी न्यूज : आज सकाळी साडेसहा वाजता पुण्यातील (Pune) शनिवार वाडा येथे भूपेंद्र डेरवणकर यांना इंडो अथलेटिक्स सोसायटी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी इंडो एथिलिटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, सुधाकर टिळेकर, रमेश माने, मंगेश भुजबळ, दादासाहेब संतोष नखाते, अमित नखाते, संदीप गायकवाड, मोहिमेबद्दल माहिती सांगत असताना भूपेंद्र डेरवणकर म्हणाले, की या वर्षी आपण सायकल स्वारी करून दुर्गदर्शन आणि संवर्धनाचा प्रसार तसेच प्रचार करणार आहोत. यादरम्यान नुकतेच पंढरपूर ते पंजाब घुमान यात्रा यशस्वीपणे करणारे विजय भालसिंग यांचा देखील आय ए एस तर्फे सत्कार करण्यात आला.

खालील प्रमाणे दुर्गदर्शन व संवर्धन मोहीम असणार आहे – 

दिवस पहिला – पुणे ते लोणावळा
दिवस दुसरा – लोणावळा, कर्जत, पेन ते अलिबाग
दिवस तिसरा – अलिबाग, रेवदंडा, मुरुड ते रोहा
दिवस चौथा – रोहा ,कोलाड, निजामपूर ते रायगड
दिवस पाचवा – रायगड, चांभारगड, उमरठ ते खेड
दिवस सहावा – खेड, चिपळूण ते संगमेश्वर
दिवस सातवा – संगमेश्वर ते राजापूर
दिवस आठवा – राजापूर ते देवगड
दिवस नववा – देवगड ते मालवण

या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी दुर्ग संवर्धन विषयी (Pune) माहिती त्याचप्रमाणे दुर्ग स्वच्छते विषयी देखील प्रबोधन करण्यात येईल. मागील वर्षी भूपेंद्र कडून पुणे ते आग्रा हा 1250 किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे करण्यात आला होता, असे इंडो एथिलिटिक्स सोसायटीचे गजानन खैरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.