Pune : मार्केट यार्डमधील भुसार बाजार आजपासून सुरू -शेखर गायकवाड

0

एमपीसी न्यूज – मार्केट यार्डातील भुसार बाजार आजपासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच दिली. होलसेल व घाऊक खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि व्यक्तींनी मार्केट यार्डमधून खरेदी करावी. किरकोळ खरेदी करणाऱ्यांनी शहरातील शेतकरी आठवडा बाजारातून किंवा महापालिकेच्या भाजी मंडईतून खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मार्केट यार्डमध्ये फक्त एक क्विंटलपेक्षा अधिक वस्तू घेणाऱ्यांना परवानगी आहे. रिटेल, किरकोळ विक्रेत्यांना या ठिकाणी परवानगी राहणार नाही, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सर्वसामान्य पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात माल खरेदी करीत आहेत. किरकोळ विक्री करणाऱ्या किराणा दुकानांमधील माल संपत चालला आहे. त्यामुळे जादा दरानेही माल विकला जाण्याची भीती आहे. त्याचा आर्थिक फटका नागरिकांनाच बसण्याची शक्यता आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like