Pune-Bhuvaneshwar Express : पुणे-भुवनेश्वर दरम्यान सुपर फास्ट विशेष गाडी

एमपीसी न्यूज – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते भुवनेश्वर ( Pune-Bhuvaneshwar Express ) दरम्यान अतिरिक्त सुपर फास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी शनिवारी (दि. 18) पुणे येथून सुटणार आहे.

गाडी क्रमांक 01451 पुणे-भुवनेश्वर सुपर फास्ट विशेष रेल्वे शनिवारी (दि. 18) पुण्याहून सकाळी 11.30 वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 2.30 वाजता भुवनेश्वर येथे पोहोचेल.

Pimpri : डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, शक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चकरधरपूर, टाटानगर, हिजली, बालेश्वर, भद्रक, जाजपुर के रोड आणि कटक.

या गाडीला दोन एसी-3 टियर,18 स्लीपर क्लास, दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन ( Pune-Bhuvaneshwar Express ) असे एकूण 22 कोच असतील. गाडीचे आरक्षण सुरु झाले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.