Pune : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात साकारले त्यांचे भव्य चित्र

एमपीसी न्यूज- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. यानिमित्त पुण्यातील नारायण पेठेत एका इमारतीवर त्यांचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेला आदर आणि प्रेमापोटी युवासेनेचे शहर अध्यक्ष निरंजन दाभेकर यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. चित्रकार निलेश खराटे यांनी हे चित्र साकारले आहे.

तब्बल 60 बाय 30 या भल्या मोठ्या आकारात हे चित्र असून भारतात प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र काढल्याचा दावा दाभेकर यांनी केला. बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना देण्यासाठी हे चित्र साकारल्याचे दाभेकर यांनी सांगितले.मागील दोन दिवसांपासून या चित्राचे काम सुरू होते. आज या चित्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.