Pune : पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खडड्याच्या चढावरुन घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा व्यवस्थितरित्या न बुजवल्यामुळे, खड्डयाच्या चढावरून घसरून दुचाकीवरून जाणा-या एका जेष्ठ नागरिकाचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी(दि.14) सकाळी साडेसहा च्या दरम्यान मुंढवा येथील बॉटनिकल गार्डनजवळ घडली.

रशीद रूस्तम इराणी (वय 60, रा. सरबतवाला चौक, कॅम्प) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राकेश बोबडे यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील बॉटनिकल गार्डनजवळील ताडीवाला चौक ते मुंढवा चौक या रोडवर पिण्याच्या पाण्याच्या पाईपचे लिकेज काढण्यासाठी रोडचे खोदकाम करण्यात आले होते. लिकेज काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला खड्डा बुजवून खड्डयाच्या बाजूने बॅरिगेट्स लावणे आवश्यक होते. परंतु तो खड्डा व्यवस्थितपणे न बुजवता खड्ड्यावर मातीचा चढ केला होता. दरम्यान रशीद इराणी हे त्या निष्काळजीपणे बुजवलेल्या खड्डयावरून दूचाकीने जात असताना त्यांची दुचाकी घसरली आणि ते खाली पडले. यामध्ये रशीद इराणी गंभीररित्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा दू्र्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.