Pune : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका (Pune) दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बोडकेवाडी फाटा, माण रोड येथे घडली.

राजेश माणिकराव आरबाड (वय 45, रा. माणगाव, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश राजेश आरबाड (वय 20) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ महेश धर्मट्टी (रा. पुनावळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील दुचाकीवरून जात होते. बोडकेवाडी फाटा येथे आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या एका कारने (एमएच 12/जेएम 0925) त्यांच्या (Pune) दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांचे वडील गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

RBI : दोन हजाराच्या 50 % नोटा मुदतपूर्वीच बँकेत जमा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.