Pune : ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज – ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात ट्रकच्या( Pune) चाकाखाली आल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना वाघोलीतील बकोरी रस्त्यावर शुक्रवारी घडली. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशांक सज्जनराव धाबेकर (वय 30 , मूळ रा. लातूर, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालक अकबर मोहमंद पठाण (वय 47 , रा. भीमनगर, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलिस कर्मचारी नीलकंठ शिंदे यांनी फिर्याद दिली. शशांक हा दुचाकीवरुन बीजेएस चौकाच्या दिशेने जात होता. याचवेळी ट्रकही त्याच दिशेने जात होता. चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तो मूळचा लातूर येथील आहे. तो खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगी  ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.