Pune : दुचाकी घसरल्यामुळे दुचाकीस्वार रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- दुचाकी घसरल्यामुळे दुचाकीस्वार रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या जीप चालकाने प्रसंगावधान राखत जीप बाजूला घेतल्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्रीच्या सुमारास पुण्यात रमणबाग प्रशाला चौकामध्ये घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.