Pune : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून गाड्या चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – यूट्यूबवर व्हिडीओ पाहून गाड्यांची चोरी करणा-या चोरट्याला गुजरवाडी फाट्याजवळ भारती विद्यापीठ पोलिसांनी बुधवारी (दि.12) ताब्यात घेऊन 3 दुचाकी व 2 लॅपटॉप असा एकूण 1 लाख 70 हजारांचा माल जप्त केला आहे.

आकाश मोतीलाल कोटवाल (वय 20, रा. चारणेवाडी, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर भारती विद्यापीठ येथे पोलीस गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी उज्वल मोकाशी व शिवा गायकवाड यांना गुजरवाडी फाटा येथे एक इसम थांबलेला असून त्याने एका आठवड्यापूर्वी रात्री एक दुचाकी चोरली होती अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी गुजरवाडी फाट्याजवळ जाऊन तिथे फिरत असलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली व त्याला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या 3 दुचाकी व 2 लॅपटॉप असा एकूण एक लाख 70 हजारांचा माल जप्त केला. तपासादरम्यान त्याच्यावर यापूर्वी दाखल असलेले चोरीचे चार गुन्हेदेखील उघडकीस आले असून आरोपी आकाश कोटवाल हा यूट्यूब वर व्हिडीओ पाहून गाड्यांची चोरी करत असल्याचे त्याने सांगितले.

याप्रकरणी तपास पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.