BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ब्रेन डेड युवकाच्या अवयवदानातून ४ जणांना जीवनदान

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – एका ब्रेन डेड युवकाच्या अवयवदानातून चार रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अवयव दानचा निर्णय त्या युवकाच्या नातेवाईकांनी घेतल्याने आज चौघांना जीवदान मिळाले आहे.

वडील शेतकरी आई गृहिणी असे मूळ अंबेजोगाई येथील कुटूंबीय भोसरीत खाजगी कंपनीत त्यांचा २६ वर्षीय मुलगा नोकरीला होता. हा युवक दि. १४.२.२०१९ रोजी पुणे-सातारा महामार्गावर अपघातात जखमी झाला. खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. पुढील उपचारांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात दि. १८-२-२०१९ रोजी ट्रामा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

  • तज्ञ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही रुग्णाचा उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्याला २०-०२-२०१९ रोजी ब्रेन डेड घोषित करण्यात आले. नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर अवयवदानास संमती मिळाली. झेड.टी .सी.सी.च्या प्रतीक्षा यादीनुसार हृदय आणि यकृत पुण्यातील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात आले. एक मूत्रपिंड नाशिकच्या खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपण करण्यात आले आहे. पुण्यातील सदर महिला रुग्ण गेली दोन वर्ष ससूनमध्ये उपचार घेत होती.

अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुरेश पाटणकर, डॉ.राजेश श्रोत्री, डॉ.भालचंद्र कश्यपी, डॉ.अमेय पाटील, डॉ.अभय सदरे, डॉ.शशिकला सांगळे, डॉ.रोहन धारापवार, डॉ.शार्दूल दाते, भूलतज्ञ् डॉ. विद्या केळकर, डॉ.योगेश गवळी, डॉ.गायत्री तडवलकर यांच्या पथकाने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली त्यांना रुरुखसाना सय्यद सिस्टर, अर्जुन राठोड व आकाश साळवे इ.चे सहकार्य लाभले.

अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे म्हणाले, ही ससूनमधील १४ वी मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय हे सर्वसामान्यांचा आधार बनलेले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.