Pune : मांज्यामध्ये अडकलेल्या जखमी घारीला युवकांनी दिले जीवदान

एमपीसी न्यूज – पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून जखमी झालेल्या घारीला युवकांनी जीवदान दिले. पुण्यात नाना पेठमधील किराड वाड्यामध्ये ही घटना घडली.

सामाजिक कार्यकर्ते दिनेश नायकू यांना आपल्या घराजवळ ही घार जखमी अवस्थेत आढळली. या घारीच्या पखांना पतंगाचा मांजा गुंडाळला गेला होता . त्यामुळे घारीला आकाशात उडता येत नव्हते. त्यांनी त्वरित सर्पमित्र सॅमसन दीपक ठाकूर यांना फोन करून बोलावून घेतले. सॅमसन दीपक ठाकूर त्वरित आपला व्यवसाय बाजूला ठेवून घारीला जीवदान देण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

प्रथम त्या घारीला पाणी व मांसाचे तुकडे खायला दिले. त्यानंतर तिला पुढे वैद्यकीय उपचारासाठी शंकरशेठ रस्त्यावरील प्राणी पक्षांच्या दवाखान्यात नेण्यात आले. दिनेश नायकू, राहुल निगडे, श्री सांगा, दीपक मोरे, शुभम शिंदे आदींनी या घारीच्या जीवदानासाठी विशेष परिश्रम घेतले. जखमी घारीला जीवदान दिल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.