Pune : ‘आयएमईडी ‘ तर्फे ‘ बिझडम ‘ प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) तर्फे ‘ बिझडम् ‘ या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन एमबीए विद्यार्थ्यासाठी करण्यात आले होते. ही स्पर्धा नुकतीच भारती विद्यापीठ आयएमईडीच्या पौड रोड कँपसमध्ये झाली.

सिंगापूरच्या ‘बिझनेस अॅनालिस्ट’ स्वाती मिश्रा तसेच डॉ सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक) यांच्या हस्ते स्पर्धचे उद्घाटन झाले. गुरफान खान आणि भारमल सकीना मोहम्मद हे विजेते ठरले.

डॉ सचिन वेर्णेकर यांनी विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान केले. एकूण सहा संघांनी भाग घेतला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.