_MPC_DIR_MPU_III

Pune : भाजप-काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर; आता ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ कोणाला मिळणार?

'बंडखोरी'च्या भीतीने यादी लांबली; कोथरूडमध्ये राष्ट्रवादीकडून चंद्रकांत मोकाटे, मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज – भाजपने 8 तर, काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या 3 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. यामध्ये सर्वांत उत्सुकता राष्ट्रवादीने लावली आहे. एरवी झटपट निर्णय घेणारे अजित पवार आता का थांबले आहेत?, याचे कोडे अनेकांना उलघडेना. पुण्यातील मेळाव्यात त्यांनी निवडून येण्याची क्षमता, या निकषावरच उमेदवारी मिळणार असल्याचे जाहीर केले होते.

_MPC_DIR_MPU_IV

विशेषतः खडकवासला, पर्वती आणि वडगावशेरी मतदारसंघात उमेदवार कोण असणार? याकडे लक्ष लागले आहे. या तिन्ही मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. बंडखोरी होऊ नये, म्हणून उमेदवार जाहीर होत नसल्याचे बोलले जात आहे. तर, कोथरूड हा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.

_MPC_DIR_MPU_II

मित्रपक्ष मनसे असल्याची कुजबुज होती. पण, या पक्षाने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोथरूडमधून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.

कोथरूडमधून राष्ट्रवादीने पड काढल्याची जोरात चर्चा चालू असतानाच, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी राष्ट्रवादी ची उमेदवारी घेणार का? याकडे कोथरूडकरांचे लक्ष लागले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.