Pune : भाजप, काँग्रेसच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून भरले अर्ज; ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार उद्या भरणार अर्ज

एमपीसी न्यूज – भाजप, काँगेसच्या उमेदवारांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वडगावशेरीमधून जगदीश मुळीक, पुण्य कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे, कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांनी भाजपतर्फे अर्ज दाखल केले.

काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधून, शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट, कसबा मतदारसंघातून अरविंद शिंदे यांनी अर्ज दाखल केल्याचे समजते. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार असल्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.