Pune : भाजपकडून सर्वसाधारण सभा तहकूब; विरोधकांची कोरोनावरील चर्चेची मागणी फेटाळली

BJP convenes general meeting; The opposition's demand for a discussion on Corona was rejected

एमपीसी न्यूज – जिवावर उद्धार होऊन आम्हीही सर्वसाधारण सभेला आलो आहोत. त्यामुळे कोरोनावर चर्चा करा, अशी विरोधी पक्षांची मागणी भाजपने फेटाळून लावली. कोरोनाचे संकट असल्याने सभा चालविणे बरोबर होणार नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या तहकुबिला काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना या विरोधी पक्षांतर्फे विरोध करण्यात आला. त्यानंतर मतदान घेण्यात आले. यामध्ये 60 विरुद्ध 34 असे मतदान होऊन ही सभा तहकूब करण्यात आली.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, या सभागृहात आज वर आणि खाली 150 ते 200 माणसे उपस्थित आहेत. कंटेन्मेंट झोन अशा सर्वच भागांतील हे लोक आहेत. सर्वच नगरसेवक, अधिकारी फिल्डवर काम करणारे आहोत, त्यामुळे एखाद्याला कोरोना झाला तर काय करायचे असा सवाल उपस्थित करून सभा तहकूब करणे आवश्यक आहे.

ज्या ज्या सभासदांना जी माहिती हवी आहे ती त्यांना लेखी स्वरूपात माहिती क्षेत्रीय कार्यलयस्तरावर देण्यात यावी, असे आदेशही महापौरांनी दिले.

पुणे शहरात कोरोनाचे दहा हजारांच्या वर रुग्ण आहेत. दोन महिने सभासदांच्या सभेसाठी सह्या झालेल्या नाहीत. त्यामुळे सभा घ्यावी लागली, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

तर, तुम्ही प्रत्येक वेळी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेता, याला शिवसेनेचा विरोध असल्याचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. तुमचे चुकीचे कामकाज रेटून नेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कोरोना संदर्भात महापालिका प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या, याची आयुक्तांनी माहिती द्यावी. ते सभेला का आले नाहीत, असा सवाल नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या सभेत चीन हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.