Pune : अंदाजपत्रकातील 7 हजार 390 कोटी रुपयांचा टप्पा पार करणे अवघडही नाही; भाजप नगरसेवकांचे विरोधकांना उत्तर

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 चे 7 हजार 390 कोटी रुपये अंदाजपत्रक पार करणे सोपे नाही, पण अवघडही नाही, आशा शब्दांत भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षांना उत्तर दिले. 

 

गोपाळ चिंतल म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती आहे. पुन्हा एकत्र यावे लागेल. 7 हजार 390 कोटींचे बजेट पार करणे सोपे नाही, पण अवघडही नाही. यामध्ये पंतप्रधान आवास योजना अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यातून गोरगरिबांना तातडीने घरे मिळावी. एचसीएमटीआर संदर्भात स्वयंसेवी संस्थांच्या काही समस्या आहेत. आयुक्तांनी त्या समजून घ्याव्यात. मुख्य सभेची मान्यता घेतल्या शिवाय कोणतेही कामे आयुक्तांनी करू नये. आम्ही मंजूर केलेली कामे करण्यात यावी.

 

राजेश येनपुरे म्हणाले, हेमंत रासने यांनी महसूल वाढीसाठी कक्ष स्थापन केला. 10 रुपयांमध्ये बस प्रवास, ही महत्वाची घोषणा आहे. कसबा मतदारसंघ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. 28 वर्षानंतर मी या सभागृहात आलोय. या काळात पक्षाचे काम करीत होतो.

 

आरती कोंढरे म्हणाल्या, भाजप आणि अंदाजपत्रकावर केवळ टीका करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. आम्ही प्रत्युत्तर देत नाही. आमच्या पक्षाचे संस्कार आहेत. आम्हाला वरिष्ठ सभासदांकडून शिकायचे आहे. यापुढे बहुमताचा अवमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
स्थायी समिती अध्यक्षांनी शहराच्या विकासासाठी विचार केला आहे. नगरसेविका मनीषा लडकत, प्रिया गदादे, उज्वला जंगले यांनीही आपले विचार मांडले.

 

बजेट म्हणजे ‘आमदानी आठन्नी, खर्चा रुपय्या’ : सुजाता शेट्टी
 अंदाजपत्रकातील घोषणा महत्त्वाच्या आहेत. मंगळवार पेठ – जुना बाजार परिसरात डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. 7 हजार 390 कोटी बजेट मांडले. हे बजेट म्हणजे ‘आमदानी आठन्नी, खर्चा रुपय्या’ असल्याची टीका काँग्रेस नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी केली. हे बजेट फुगवले आहे. आयुक्तांनी दिलेले बजेट स्थायी समिती अध्यक्षांनी का कापले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.