Pune : महापालिकेत पनवेलच्या डान्सबरवरून भाजपच्या नगरसेवकांची हरकत

महापालिकेत उधळपट्टी होत असल्याचे सुभाष जगताप यांचे वक्तव्य सत्ताधाऱ्यांना टोचले

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत उधळपट्टी सुरू आहे. सुमारे 200 कोटी रुपयांची उधळपट्टी होत आहे. पनवेलला होती ती उधळपट्टी कशावर? असा सवाल स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी उपस्थित केला असता, त्यावर भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी हरकत घेतली.

ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेकांचे जीव गेले, एवढ्या गंभीर विषयावर विनोद करणे बरोबर नसल्याचे घाटे म्हणाले. तर, डान्सबार बंद करण्याचा निर्णय स्व. आर. आर. पाटील यांनी घेतला होता. त्यांना आज काय दुःख झाले, असेल असे नगरसेवक आदित्य माळवे म्हणाले. माझे बोलणे तुम्हाला एवढे टोचले तर, प्रसारमाध्यमात महापालिका उधळपट्टी करीत असल्याचा बातम्या छापून येतात, तेव्हा का नाही आरडाओरड करत? असा सवालही जगताप यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.