Pune : भाजपच्या वतीने चार हजार नागरिकांना ‘अन्नधान्य किट’चे वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक १६- सोमवार-मंगळवार-रास्ता पेठ भागात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुमारे चार हजार नागरिकांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वितरण करण्यात आले. स्वीकृत नगरसेवक व पक्षाचे शहर संपर्क प्रमुख गणेश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदानंदनगर, भीमनगर, इंदिरानगर ,सोमवार पेठ, रास्ता पेठ या भागातील दोन हजार कुटुंबियांना अन्नधान्याच्या किटचे वितरण करण्यात आले.

हातावर पोट असलेल्या अनेकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्नही बिकट झालेला आहे. केंद्र सरकारतर्फे ५ किलो गहू मोफत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. गव्हाबरोबरच जे आवश्यक अन्नधान्य देणे गरजेचे आहे, ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला असल्याचे गणेश बिडकर यांनी सांगितले.

साखर, तेल, तिखट, हळद, पोहे, रवा, मूग, मटकी आणि मसूर डाळ, चहा पावडर, लाईफ बाँय साबण असा हा किट ४००० हजार कुटुंबांना वितरित करण्यात आला.

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीने एका कार्यकर्त्यावर पन्नास कुटुंबियांची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रथम एक कूपन या घरांमध्ये वितरित करण्यात आले. यात कोणत्या दुकानातून वस्तू घेता येतील आणि कोणती वेळ असेल याचा तपशिल देण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही दुकानात गर्दी न होता, ४००० हजार कुटुंबियांसाठी शिधा वाटप करण्यात आले.

प्रभागातील भाजपाचे ५० कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. गरजवंतांसाठी भाजपाचे कार्यकर्ते सदैव पुढे राहतील आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजुटीने सामना करू, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.