Ganesh Bhegade : निमित्त वाढदिवसाचे अन् लक्ष्य विधानसभेचे!

एमपीसी न्यूज – माजी मंत्री बाळा भेगडे यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती सहकारी अशी ओळख असलेले भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) गणेश भेगडे (Ganesh Bhegade) यांना आता मुंबईला जाण्याचे वेध लागल्याचे दिसते. कारण, गणेश भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात झळकलेल्या बहुतांश शुभेच्छा फलकांवर विधानभवनाचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेला बाळाभाऊ आणि विधानसभेला गणेशतात्या उमेदवार असतील का, अशी जोरदार चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.

दरम्यान, ‘एमपीसी न्यूज’ने याबाबत गणेश भेगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सूचक मौन पाळणे पसंत केले.

गणेश भेगडे (Ganesh Bhegade) यांचा उद्या (2 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मावळ तालुक्यात शुभेच्छांचे फलक झळकले आहेत. भेगडे यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. गणेश भेगडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत नगरसेवक, विरोधी पक्षनेते, पक्षाचे प्रतोद म्हणून काम केले आहे. नगरपरिषदेचा मोठा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. अभ्यासू, फर्डे वक्ते, आक्रमक म्हणून ते मावळवासीयांना सुपरिचित आहेत. मावळ भाजप मधील ‘थिंक टँक’ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षाच्या महत्वाच्या निर्णयात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. राजकीय क्षेत्राबरोबरच सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे.

माजी मंत्री, माजी आमदार बाळा भेगडे यांचे अतिशय विश्वासू, उजवा हात अशीही गणेश भेगडे यांची ओळख मावळ तालुक्यात ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये बाळा भेगडे राज्यंमत्री झाल्यानंतर त्यांच्याकडील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी गणेश भेगडे (Ganesh Bhegade) यांच्याकडे 29 जुलै 2019 रोजी सोपविण्यात आली. साडेतीन वर्षांपासून गणेश भेगडे जिल्हाध्यपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गणेश भेगडे हे बाळा भेगडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले.

Maval News : पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण होणार

बाळा भेगडे यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका निभावली. सलग दोनवेळच्या विजयानंतर बाळा भेगडे यांना तिस-यावेळी म्हणजेच 2019 मध्ये पराभव पहावा लागला. त्यापार्श्वभूमीवर आता गणेश भेगडे (Ganesh Bhegade) यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या फलकांवर विधानभवनाचा फोटो पाहिला मिळत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

बाळा भेगडे यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बाळाभाऊ मावळ मधून भाजपचे उमेदवारही असू शकतात, असाही एक होरा आहे. त्यामुळे बाळाभाऊ लोकसभा आणि गणेशतात्या विधानसभा लढवू शकतील का, अशी जोरदार चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.